दिनांक ३०/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीचे लोकार्पण बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात आले व ग्रामपंचायत ला ISO प्रामाणिकरण प्राप्त झालेले आहे.निलज ग्रामपंचायत भवन सर्व सुविधांनी युक्त आहे. त्याचप्रमाणे CCTV Camere लावलेले आहे.आपले सरकार सेवा केंद्र करिता स्वतंत्र रूम व बैठक व्यवस्था असून त्या द्वारे गावातील जनतेला वीज, व पाणी बिल भरण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. लोकांना गावातच बँकिंग सुविधा आपले सरकार सेवा केंद्रा च्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याच बरोबर शासकीय प्रमाणपत्रे वेळेत देऊन लोकांच्या वेळ व खर्चाची बचत होत आहे.