मी स्वत ह्याच गावात जन्मलो असल्याने बालपणापासूनच  ह्याच ठिकाणी वास्तव्य असल्याने  गावातील व समाजातील अडीअडचणी बद्दल बर्यापैकी जान होतीच. त्यामुळे गावाच्या कारभाराच्या मुख्य प्रवाहात येऊन त्या अडी -अडचणी सोडविण्याकरिता  व ज्या समाजात आपण घडलो  त्याच ऋण फेडण्यासाठी मी स्वतः खारीचा वाटा उचलावा म्हणून या एकाच उद्देशाने मी समाजकारण व राजकारण या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला . सर्वप्रथम मी सन १५/०२/२०२१ यामध्ये गावाच्या कारभारात  प्रवेश करून ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदावर निवडून आलो.गावातील  विकास,सामाजिक सलोखा ,एकोपा ठेऊन समाजाची उन्नती साधायची असेल तर गावातील  प्रमुख पदावर म्हणजेच सरपंच पदावर लोकांना दिलेल्या सैविधानिक अधिकार मतदान प्रकिया  पार पाडून  त्यामध्ये  यशस्वी होऊन.गावातील सार्वत्रिक परिस्थितीचा योग्य विनियोग,उपयोग करून “आपल गावच नाही का तीर्थ “ याप्रमाणे विचार करून  परमपूज्य वैराग्य मूर्ती  गाडगेबाबा व ग्राम विकासाचे जनक राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज याचा विचारांचा वारसा घेऊन मी आपल्या कार्यकाळात  काम करण्याचा प्रयन्त करीत आहे .

ग्रामपंचायत निलज अंतर्गत २ अंगणवाडी केंद्र असून मुलांन करिता सौर उर्जा ,शौचालय ,शुद्ध,व स्वच्छ पाण्याची व्यवस्था,व खेळणे व अंगणवाडी केंद डीजीटल करण्यात आलेली आहे. निलज व कोटलपार मिळून २ जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळा आहेत.

          गावाच्या बाबतीत आरोग्य सोयीकरिता  गावाच्या जवळच  ३ किमी अंतरावर भुयार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व १ किमी  अंतरावर आमगाव येथे  आरोग्य उपकेंद्र उप्लब्ध असून गावा मधेच आशा सेविका ह्या उत्तम प्रकारे सेवा बजावत असल्याने गावातील  लहान बाळाचे कुपोषण ,क्षयरोग , अश्या  प्रकाचे आजारापासून गाव मुक्त झालेले आहे  त्याच प्रमाणे  गरोदर,स्तनदा माता , लहान बालक याचे लसीकरण महिन्यातील दुसर्या सोमवारी ह्याच ठिकाणी उप्लब्ध  करण्यात  येत असल्याने त्याची गैरसोय होत नाही, त्याचप्रमाणे वयोरुद्ध , व गावातील नागरिक यांना आरोग्य तपासणी शिबीर  ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने  नियमित राबविण्यात येते .