
गावाची साक्षरता वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो. आज गावामध्ये आर्थिक परिस्थीती तनसल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दहावीमध्ये चांगले गुण प्राप्त करुनही त्यांना योग्य मार्गदर्शना अभावी नुकसान होते . होतकरु आणि गरीव विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमध्ये अशा हुशार सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मी एक ठराव मंजूर केल. याद्वारे गावातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत निधीची तरतूद करून त्यांच्या पंखात उंच उडण्याची आशा उत्पन्न करण्याचा मी प्रयत्न केल.



पानी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा “संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान,”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2024 – 2025 यां अभियान अंतर्गत विशेष पुरस्कार “वसंतराव नाईक पुरस्कार” (घनकचरा सांडपाणी व मैला व्यवस्थापन )*
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२४_२०२५ अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्ध्येत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत निलज ता. पवनी जिल्हा भंडारा यांना मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा यांच्या हस्ते चैतन्य ग्राउंड भंडारा दिनांक २६.१.२०२६ ला सन्मानित करण्यात आले.🙏🙏🙏