.गावातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून बचत गटाद्वारे गावात.”शुद्ध शितल जलधारा” (RO ) ची सोय करण्यात आली आहे व त्याचा गावकरी वापर करत आहे.

गावात असेलल्या ३ पाण्याच्या टाक्या द्वारे संपूर्ण गावात घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठाची सोय करण्यात आलेली आहे. पाण्याच्या तीनही टाकी च्या मोटारी सौर उर्जेवर करण्यात आलेल्या असल्यामुळे विजेची फार मोठी बचत होत आहे
गावाच्या बाबतीत आरोग्य सोयीकरिता गावाच्या जवळच ३ किमी अंतरावर भुयार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व १ किमी अंतरावर आमगाव येथे आरोग्य उपकेंद्र उप्लब्ध असून गावा मधेच आशा सेविका ह्या उत्तम प्रकारे सेवा बजावत असल्याने गावातील लहान बाळाचे कुपोषण ,क्षयरोग , अश्या प्रकाचे आजारापासून गाव मुक्त झालेले आहे त्याच प्रमाणे गरोदर,स्तनदा माता , लहान बालक याचे लसीकरण महिन्यातील दुसर्या सोमवारी ह्याच ठिकाणी उप्लब्ध करण्यात येत असल्याने त्याची गैरसोय होत नाही, त्याचप्रमाणे वयोरुद्ध , व गावातील नागरिक यांना आरोग्य तपासणी शिबीर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने नियमित राबविण्यात येते .



मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम
दिनांक १४.२.२०२६ ला नियत कालमानानुसार. ग्रामपंचायत कार्यालय निलज येथील ,” पदाधिकारी कार्यकारणी ” आज पासुन गावकऱ्यांच्या सेवेतून निवृत होत असल्याने सर्व पदाधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सौजन्याने ,*समारोपीय निरोप संभारभ * कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गावातील जेष्ठ नागरिक त्याचं प्रमाणे सर्व पद्धाधिकारी, अधिकारी , मित्र मंडळी उपस्थित होते त्यावेळीची काही क्षणचित्रे…..



