गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका व वाचनालय ची निर्मिती करण्यात आलेली आहे.त्याद्वारे गावातील मुले स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा करिता वाचनालयाचा लाभ घेत आहे.सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असून वीज, व पाण्याची सोय करण्यात आलेली आहे व जनता सार्वजनिक शौचालया चा व वैयक्तिक शौचालया चा वापर करत असल्यामुळे गाव संपूर्ण हागणदारीमुक्त झालेले आहे.व तसे शासनातर्फे प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेले आहे