प्रशाशन हे लोकांना लोकउपयोगी  आपले आहे असे वाटले पाहिजे  त्या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले असून त्या मधील सर्व सेवा शासकीय दरांप्रमाणे  सेवा पूरवल्या जात आहेत. सर्व प्रकारचे दाखले आनलाईन  नागरिकंना देण्यात येत आहे.

             ग्रामपंचायती मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व सभा ,ग्रामसभा ह्यामध्ये नागरिकाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कर संकलन  जवळपास ९०-९५%  होत आहे .गावात मध्ये सर्व प्रकारच्या योजना पारदर्शी पणे राबविण्यात येत असून  १५ व्या वित्त आयोग निधी चे खर्चाचे प्रमाण हे ८०% पर्यंत आहे . महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत, नागरिकांना राज्य सरकारने पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरविल्या जात आहे