
गावातील महिला निराधार आणि अनाथांसाठी महत्वपूर्ण कार्य करेन.दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय गरीबीमुळे व अल्प शिक्षणामुळे अनेक महिलांग कर्तुत्वाची इच्छा असुनही विकासापासून दूर रहातात त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी लघुउद्योगातून म्हणजेच कुक्कुटपालन, शेळी पालन, बचत गट, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळवून दिल.




नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गावात राबविण्यात येत आहे.

पानी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा “संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान,”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2024 – 2025 यां अभियान अंतर्गत विशेष पुरस्कार “वसंतराव नाईक पुरस्कार” (घनकचरा सांडपाणी व मैला व्यवस्थापन )
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२४_२०२५ अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्ध्येत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत निलज ता. पवनी जिल्हा भंडारा यांना मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा यांच्या हस्ते चैतन्य ग्राउंड भंडारा दिनांक २६.१.२०२६ ला सन्मानित करण्यात आले.🙏🙏🙏


